औरंगाबाद : पैठण येथील नाथमंदिरात शनिवारी जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन विधीवत हिंदुधर्म स्विकारला असल्याचा दावा नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी केला होता. मात्र, मुळात आम्ही आधीपासूनच हिंदू असून आणि कोणतेही धर्मांतर केले नसल्याचा दावा जालन्यातील कथित धर्मांतर करणाऱ्या कुटुंबाने दिला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांतून सुरू असलेल्या धर्मांतरच्या ‘त्या’ मुद्यावर आता परदा पडला आहे.

एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या कुटुंबाने आपली बाजू मांडताना म्हंटले आहे की, आम्ही पैठणला फक्त देवदर्शनासाठी गेलो होतो. मागील काही दिवस लॉकडाऊन होता त्यामुळे या काळात आम्हाला दर्शनासाठी जाता आलं नाही. तर आम्ही आधीपासूनच हिंदू असून आमच्या घरात मंदिर आहेत. आम्ही कोणताही धर्मांतर केले नसून आम्ही हिंदूच असून, पैठणला फक्त देवदर्शनासाठी गेलो होतो असा दावा या कुटुंबातील लोकांनी केला आहे.

वीजबिल वसुलीसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, या शहरांमध्ये होणार कारवाई
…आणि वाद मिटला

गेल्या चार दिवसापासून या कथित धर्मांतराचा विषय चर्चेचा मुद्दा बनला होता.नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन विधीवत हिंदुधर्म स्विकारला असल्याचा दावा केला होता. तर कथित धर्मांतर करणारी लोकं ख्रिश्चन नव्हतेच असा दावा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला होता. पण ज्या कुटुंबातील लोकांबद्दल कथित धर्मांतर केल्याचा दावा केला जात होता, त्या कुटुंबाने धर्मांतर केलेच नसल्याचा खुलासा केला असल्याने या वादावर आता पडदा पडला आहे.

नागपूरकरांसाठी जमावबंदी नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here