औरंगाबाद : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र असे असताना ओमिक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सद्यातरी फक्त मुंबई पुण्यातच उपलब्ध असल्याने अहवाल येण्यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये सुद्धा जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरू होता. मात्र जागेच्या मुद्द्यावरून दोन ठिकाणीची चाचपणी सुरू असताना आता घाटी रुग्णालयातच ही लॅब सुरू करण्याचं ठरलं असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

विदेशातून औरंगाबादमध्ये येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. तर ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांचा स्वॅब पुन्हा एकदा खबरदारी म्हणून जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवला जात आहे, जेणेकरून ओमिक्रॉनची लक्षणे आहे की नाही याची खात्री होईल. मात्र जिनोम सिक्वेन्सिंग लॅब फक्त मुंबई-पुण्यात उपलब्ध असल्याने औरंगाबादचे अहवाल पुण्यात पाठवली जात आहे. मात्र जास्त भार असल्याने रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्येच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या, पण जागेबाबत स्पष्टता नव्हती.

वीजबिल वसुलीसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, या शहरांमध्ये होणार कारवाई
जिनोम सिक्वेन्सिंग लॅब शहरात सुरू करण्याची परवानगी मिळाली तर यासाठी घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज ची प्रयोगशाळा असे दोन पर्याय प्रशासनाकडे होती. त्यामुळे या दोन्ही पैकी कोणतं ठिकाण निवडावे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती,ज्याचा अहवाल आला असून, घाटी रुग्णालयातच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्याचं ठरलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Samsung Smartphone: २,५०० रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा ५जी स्मार्टफोन, ३ हजार रुपये डिस्काउंटचाही मिळेल फायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here