उस्मानाबाद : तुळजापूर शहरातील चेतना वाईन शॉप शेजारील चप्पल दुकान, मसाले दुकानला रात्री अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली यात दोन्ही दुकाने जळून राख झाली असून दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नगर परिषदचे अग्निशमन वाहनाने आग विझवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आग एवढी तिव्र होती की काही क्षणात दुकानातील सर्व माल जळून गेला. शेजारील सर्व दुकाने सुरक्षित आहेत. पोलिसांनी लाईनमनला बोलावून शेजारील दुकानचा विद्युत प्रवाह खंडीत करुन टाकला. नगर परिषद कर्मचारी पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.