हिंगोली : सध्या सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे गळीप हंगाम सुरू असून मागील आठवड्यापर्यंत मराठवाड्यात ४ कोटी ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यातून ३.८८ कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उत्पादनाच्या सरासरीमध्ये कोल्हापूर विभाग अग्रेसर राहिला. हा साखरेचा उतारा १०.८५ टक्के इतका आहे.

राज्यात यावर्षी ९५ सहकारी व ९३ खाजगी कारखान्यांनी गळीप हंगाम सुरू केला आहे. साधारणत ऑक्टोबर,नोव्हेंबर महिन्यापासून साखरगळापाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मराठवाड्यासह इतर ठिकाणाहून ऊस तोड मजूर कामाला लागले आहेत. दरम्यान, राज्यात गळप सूरू असेलल्या कारखाण्यांची दैनंदिन गळप क्षमता ७.६५ लाख मेट्रिक टन आहे. २३ डिसेंबरपर्यंत राज्यातील साखर विभागाच्या आठ विभागातून १८८ कारखान्यांच्या माध्यमातून ४.०६ कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून ३.८८ कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन यामधे सर्वात जास्त १.०८ कोटी क्विंटल साखरेचे कोल्हापूर विभागात उत्पादन झाले.

राज्यात साखरेच्या उत्पादनात सोबतच काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राज्यात मागील दोन वर्षे शिल्लक असलेल्या ११० लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार नाही, त्यातच ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे देशातून साखर निर्यातीला मोठी संधी आहे. साखर निर्यातीमुळे तसेच स्टॉक कमी राहणार असल्याने यावर्षी साखरेचे दर स्थिर राहतील अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष जय जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.

राज्यातील साखर कारखान्यातील गाळप व उतारा
– कोल्हापूर विभाग – ३५ कारखाने, उस गाळप ९९.६६ लाख मे. टन, साखर उत्पादन १.०८कोटी क्विंटल, टक्केवारी १०.८५ टक्के.

– पुणे विभाग – २९ कारखाने, उस गाळप ८४.०९ लाख मे. टन, साखर उत्पादन ८२.३६ कोटी क्विंटल, टक्केवारी ९.७९ टक्के.

– सोलापूर विभाग – ४३ कारखाने, उस गाळप ९७.६३ लाख मे. टन, साखर उत्पादन ८४.३१ कोटी क्विंटल, टक्केवारी ८.६४ टक्के.

– अहमदनगर विभाग – २६ कारखाने, उस गाळप ५४.३६ लाख मे. टन, साखर उत्पादन .४८.९७ कोटी क्विंटल, टक्केवारी ९.०१ टक्के.

– औरंगाबाद विभाग – २३ कारखाने, उस गाळप ३०.०९ लाख मे. टन, साखर उत्पादन २६.६६कोटी क्विंटल, टक्केवारी ८.८५ टक्के.

– नांदेड विभाग – २६ कारखाने, उस गाळप ३६.७३ लाख मे. टन, साखर उत्पादन ३४.२८ कोटी क्विंटल, टक्केवारी ०९.३३ टक्के.

– अमरावती विभाग – ३ कारखाने, उस गाळप ०२.९८ लाख मे. टन, साखर उत्पादन २.४९ कोटी क्विंटल, टक्केवारी ८ ३६ टक्के.

– नागपूर विभाग – ३ कारखाने, उस गाळप १.२२ लाख मे. टन, साखर उत्पादन ९७.कोटी क्विंटल, टक्केवारी ७.९५ टक्के.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here