हायलाइट्स:

  • ३५ हजार फुटांच्या उंचीवर असताना विमानाला अपघात
  • दुसऱ्या एका विमानातून कोसळला बर्फाचा तुकडा
  • विमानातील २०० प्रवाशी सुखरुप

लंडन, यूके:

ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानाचा हवेतच मोठा अपघात होता होता टळला. ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग 777 हे विमान हवेतच उड्डाण घेत असताना एक मोठा बर्फाचा तुकडा विमानाच्या ‘विंडस्क्रीन‘ काचेवर येऊन धडकला… आणि दोन मिनिटांसाठी पायलटचाही श्वास थांबला.

विशेष म्हणजे, अपघातग्रस्त विमानाच्या वर उड्डाण घेत असलेल्या दुसऱ्या एका विमानातून हा बर्फाचा तुकडा कोसळला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अपघातग्रस्त विमान हवेत ३५ हजार फुटांच्या उंचीवर होतं. तर दुसरं विमान या विमानाच्या जवळपास एक हजार फूट अधिक उंचीवर उड्डाण घेत होतं.

बर्फाचा तुकडा काचेवर धडकल्यानंतर बोईंग ७७७ या विमानाच्या दोन इंच जाड विंडस्क्रीनला तडा गेला. विमानाचं विंडस्क्रीन एखाद्या बुलेटप्रूफ काचेप्रमाणे असतात. विमान हवेत उंचावर उड्डाण घेत असताना अत्याधिक दबावातही या काचा टिकतात.

बाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी टाकताय? दंड भरण्यासाठी तयार राहा!
Time Capsule: अमेरिकेत आढळली १३० वर्ष जुनी ‘टाईम कॅप्सूल’… अनेक रहस्य समोर येणार?
हे विमान ख्रिसमसच्या दिवशी लंडनच्या ‘गेटविक’पासून कोस्टारिकाच्या ‘सान जोस’कडे जात होतं. अर्त्यत दुर्मिळ अशा घटनांपैंकी घडलेल्या या घटनेत तब्बल २०० प्रवाशांचा जीव बचावला आहे.

विमानाच्या अपघातानंतर आपात्कालीन लँडिंग करावं लागल्यानं दीर्घकाळापर्यंत प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. दुर्घटनेनंतर ठरलेल्या वेळेपेक्षा ५० तासांच्या उशिरानं हे विमान पुन्हा एकदा आपल्या ठरलेल्या मार्गावर रवाना झालं.

केवळ ९० मिनिटांत विमान हवेत उड्डाण घेऊ शकेल, असा दावा विमान कंपनीनं केला होता. परंतु, विमानाची काच पूर्ववत करण्यासाठी अधिक वेळ लागला आणि तेव्हापर्यंत प्रवाशांना आपल्या निश्चित स्थळी पोहचण्यासाठी वाट पाहण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. यामुळे अनेक प्रवाशांचा ख्रिसमस प्लानही फिस्कटला. यासाठी, ब्रिटिश एअरवेजनं त्यांची माफी मागितलीय.

सावध राहा! जगभरात ओमिक्रॉनची ‘महालाट’, रुग्णसंख्येत ११ टक्क्यांची वाढ
लॉकडाऊन असूनही शहरात करोना फैलावलाचा कसा? अधिकाऱ्यांना फर्मावली शिक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here