हायलाइट्स:

  • ‘ताजमहाला’हून आकारानं तिप्पट मोठा लघुग्रह
  • अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’नं दिली माहिती
  • लघुग्रहाचं नामकरण – 2017 AE3

वॉशिंग्टन, यूएसए:

एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं अत्यंत वेगानं पुढे सरकत असल्याचा इशारा अमेरिकन अंतराळ संस्थानासा‘कडून देण्यात आला आहे. पृथ्वीच्या अत्यंत जवळून हा लघुग्रह प्रवास करणार आहे. नासाचे वैज्ञानिक या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

‘द सन’च्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनी या लघुग्रहाला 2017 AE3 असं नाव दिलं असून तो ताशी 75 हजार किमी वेगान पृथ्वीच्या कक्षेकडे प्रवास करत आहे. हा लघुग्रह 353 मीटर रुंद असून तो पृथ्वीच्या 19 लाख मैल जवळ येण्याची शक्यता आहे.

हा लघुग्रह अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी‘पेक्षा किंवा भारतातील ताजमहालापेक्षा तिप्पट मोठा आहे. हा लघुग्रह 19 लाख मैलांच्या अंतरावरून जात असला तरी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे अंतर खूपच कमी आहे.

या लघुग्रहानं आपला मार्ग बदलला आणि तो पृथ्वीवर आदळला तर विनाश उद्भवू शकतो, अशी पुसटशी शंकाही तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. सध्या तरी लघुग्रह 2017 AE3 पृथ्वीच्या अगदी जवळून प्रवास करणार असला तरी त्याचा कोणताही धोका पृथ्वीला नाही.

Omicron: ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट बनणार करोनाचा कर्दनकाळ? तज्ज्ञांकडून आशेचा किरण
Emergency landing: हवेतच विमानावर कोसळला बर्फाचा तुकडा, ‘विंडस्क्रीन’ला तडा आणि…
पृथ्वीच्या इतिहासात आजवर केवळ दोन लघुग्रहांनी अत्यंत जवळून प्रवास केला आहे. पहिला लघुग्रह 2020 QG होता, यानं दक्षिण हिंदी महासागरावर केवळ 1,830 मैल अंतरावरून प्रवास केला. तर दुसरा लघुग्रह 2020 VT4, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पृथ्वीपासून काही शेकडो मैलांवरून पलिकडे गेला होता.

मात्र हे लघुग्रह इतके लहान होते की त्याचा कोणताही धोका पृथ्वीला नव्हता. मात्र, असाच एखादा मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर येऊन धडकला तर काय? यासाठी शास्त्रज्ञ तयारी करत आहेत.

अॅस्ट्रॉईडस किंवा लघुग्रह म्हणजे काय?

अॅस्ट्रॉईडस किंवा लघुग्रह हे असे दगड आहेत जे सूर्याभोवती एखाद्या ग्रहाप्रमाणे फिरत असतात. परंतु ते आकाराने ग्रहांपेक्षा खूपच लहान असतात. आपल्या सौरमालेतील बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरु ग्रहाच्या कक्षेत लघुग्रहांच्या पट्ट्यात (Asteroid Belt) आढळतात.

नासाकडून सध्या जवळपास 2000 अशा लघुग्रहांवर नजर ठेवली गेलीय जी भविष्यात पृथ्वीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये, 22 अशा लघुग्रहांचा समावेश आहे जे येत्या 100 वर्षांत पृथ्वीवर आदळण्याची थोडीदेखील शक्यता आहे.

बाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी टाकताय? दंड भरण्यासाठी तयार राहा!
भडकावू भाषणांतून हिंसेचं समर्थन पडलं भारी… धार्मिक स्थळाला टाळं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here