औरंगाबाद न्यूज लाइव्ह: दूध उत्पादक संघाची निवडणूक रंगणार, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत; कोण मारणार बाजी? – fighting between bjp and congress in district co operative milk producers association elections
औरंगाबाद : मराठवाड्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे आणि देवगिरी महानंद या नावाने बाजारपेठेत स्थान मिळवलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच वातावरण तापताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ९९ अर्ज दाखल करण्यात आले होते. ज्यातील २५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
भाजपचे जेष्ठ नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे या संघाचे अध्यक्ष असून, दूध उत्पादक संघावर सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे आगामी काळात दूध संघावर आपली सत्ता आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी आमदार कल्याण काळे यांनी सुध्दा कंबर कसली असून, काळे यांनी प्रत्येक जागेसाठी उमेदवार उभे केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का; २ महिन्यापासून पगार नाही अशात महामंडळाचा नवा घाट दूध महासंघासाठी एकूण ३५० मतदार मतदान ककरणार आहे. ज्यात फुलंब्रीत तालुक्यातील ८१ तर औरंगाबाद तालुक्यात ६१ मतदार आहेत. १४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आतापर्यंत ९९ अर्ज दाखल झाली होती, ज्यातील २५ अर्ज बाद झाली आहेत. तर ११ जानेवारीपर्यंत अर्ज माघे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम…
अर्जाची छाननी : २७ डिसेंबर झाली अर्ज माघार घेण्याची मुदत : ११ जानेवारीपर्यंत चिन्हांचे वाटप : १२ जानेवारी रोजी मतदान : २२ जानेवारी मतमोजणी : २३ जानेवारी