पुणे विभागात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ झालेली नाही. आज, २६ मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत करोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२ आहे. त्यात सांगली जिल्ह्यामध्ये ९, पुणे जिल्ह्यामधील पुणे महानगरपालिका क्षेत्रात १९, आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रात १२ आणि सातारा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. एनआयव्ही संस्थेकडे पाठविलेले एकूण नमूने ९२६ होते. त्यापैकी ८६२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ६४ जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ८१४ नमूने निगेटिव्ह आले आहेत.
अन्नधान्य, भाजीपाला घरपोच देणाऱ्यांची यादी
अन्नधान्य आणि भाजीपाल्याची घरपोच सेवा देणाऱ्यांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तयार केली जाणार असून, ती यादी नागरिकांना दिली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
औषधे, किराणामाल, भाजीपाला खरेदी करताना अंतर ठेवा
जिल्ह्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरू आहे. या काळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी एक मीटरचे अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times