औरंगाबाद : औरंगाबादच्या सिल्लोड-कन्नड महामार्गावर मोढा फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला छोटा पिकप गाडीने दिलेल्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सिल्लोड रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघात मृत्यूची नावे…
या अपघातात पीकअपमधून प्रवास करणाऱ्या जिजाबाई गणपत खेळवणे (वय ६० वर्ष ), संजय संपत खेळवणे ( वय ४२ वर्ष ) संगिता रतन खेळवणे ( वय 35 वर्ष ) लक्ष्मीबाई अशोक खेळवणे ( वय ४५ वर्ष ) अशोक संपत खेळवणे, ( वय ५२ वर्ष ) सर्व रा मंगरुळ ता. सिल्लोड यांचा अपघात मृत्यू झाला आहे.