करोना आणि ओमिक्रॉनचे संकट २०२२ मध्ये वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण दिवसेंदिवस रुग्णसंख्या सुद्धा वाढत आहे. २०२२ मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत जरी लग्नाच्या तिथी असल्या तरी करोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यास जिल्हा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध जारी केले असून त्याचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. अशावेळी लग्नसमारंभात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला कसे समजावावे …? असा प्रश्न वधू-वर पीतं पुढे उभा राहिला आहे.
शूभ कार्य म्हटल्यानंतर या कार्यासाठी मोठा उत्साह आणि घाई असते. यामुळे मंगल कार्यालय बुक करणे, लग्न पत्रिका वाटप करणे, बसता बांधणी करणे, त्याचबरोबर देण्यात येणारी भांडीकुंडी इतर साहित्य खरेदी करताना वर – वधू त्यांचे नातेवाईक दिसत आहेत..
अगोदरच दोन वर्षापासून मंगल कार्यालय बंद होते. सोबतच बँड, डीजे, मंडप वाले, घोडी वाले, व्यवसायिक यांच्यावर मोठे संकट ओढवले होते. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कडक निर्बंध लागतील का या विवंचनेत ही सर्व मंडळी आहे.