सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात जामिनाच्या प्रतिक्षेत असलेले भाजप आमदार नितेश राणे (नितेश राणे) यांच्यासमोर अडचणी काही संपायला तयार नाहीत. एकीकडे जामीन मिळवण्यासाठी नितेश राणे यांच्या वकिलांना न्यायालयात सातत्याने खेटे घालावे लागत आहे. या सगळ्यामुळे नितेश राणे यांना ‘भूमिगत’ होण्याची वेळ आली. त्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने नितेश राणे यांना मोठा धक्का दिला. ज्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे हे संपूर्ण प्रकरण घडले आहे त्याच बँकेच्या गुरुवारी होणाऱ्या मतदानावेळी नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. (सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक मतदान)

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून १६ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणे यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. नितेश राणे हे जिल्हा बँकेचे १६ कोटी रुपयांचे थकीत कर्जदार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आल्याचे समजते. एका बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत भाजपप्रणीत पॅनल लढत असताना दुसऱ्या बाजूला आमदार नितेश राणे हे थकीत कर्जदार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला आहे. त्यामुळे नितेश राणे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
नारायण राणेंचा नरबळी देण्याचा प्रयत्न फसला; विनायक राऊतांची जळजळीत टीका
संतोष परब हल्लाप्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यंदा प्रचंड गाजत आहे. जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी राणे कुटुंबीयांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर ९८१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा समावेश आहे. २००८ पासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे गटाचे वर्चस्व होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्हा बँकेत सत्तांतर झाले होते. त्यामुळे आता नारायण राणे यांना काही करुन जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा हस्तगत करायची आहे.

सध्या जिल्हा बँकेत काँग्रेसचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, शिवसेना २ आणि प्रत्येकी एका जागेवर भाजप व अपक्ष सदस्य आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी पुरस्कृत समृद्धी सहकार पॅनल आणि नारायण राणे यांचे सिद्धिविनायक पॅनल यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान, सध्या नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये प्रचारात सहभागी होता आले नव्हते. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने गुरुवारी त्यांना मतदानाचा हक्कही नाकारला. आता शुक्रवारी या मतमोजणीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here