हायलाइट्स:

  • तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका दिलीप जोशी सोडणार?
  • मालिकेच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का
  • मालिका सोडण्याच्या बातमीवर दिलीप जोशींनी दिली प्रतिक्रिया

मुंबई :’तारक मेहता का उल्टा चष्मा‘ मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं अखंड मनोरंजन करत आहे. घरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ही मालिका आवड असून ते यातील सर्व कलाकारांवर भरभरून प्रेम करतात. या मालिकेतील जेठालाल, टप्पू ही पात्रं तर अनेकांच्या आयुष्याचा एक भागच झाले आहेत.

आम्हाला करोना झाल्यावर त्यावर चर्चा का होते…रिया कपूर भडकली

मालिकेतील दयाबेन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी कार्यक्रमातून जेव्हा बाहेर पडली तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या मालिकेतील अनेक कलाकार बदलले मात्र त्याचा लोकप्रियतेवर काहीही परिणाम झाला नाही. काही दिवसांपूर्वी टप्पूची भूमिका साकारणारा राज अनकटदेखील मालिका सोडणार असल्याची बातमी आली होती. थोड्या दिवसांनी तो मालिका सोडणार नसल्याचं राजने सांगितलं. आता या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी बाहेर पडणार असल्याची बातमी आल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दिलीप जोशी

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलीप जोशी यांना ते मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत असल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले की, ‘मी ज्या मालिकेत काम करतो ती विनोदी आहे. या मालिकेत काम करणे माझ्यासाठी अतिशय आनंददायी आहे. जोपर्यंत हे काम करण्यातून मला आनंद मिळत आहे, तोपर्यंत मी हे काम करणार. जेव्हा मला यातून आनंद मिळणे कमी होईल, तेव्हा मात्र मी काम नक्कीच थांबवीन.’


दिलीप जोशी यांनी या मुलाखतीमध्ये पुढे असेही सांगितले की, ‘मला अन्य काही कार्यक्रमांत काम करण्याबद्दल विचारणा झाली आहे. मात्र सध्या तरी मी ‘तारक मेहता..’ मालिकेलाच प्राधान्य देत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इतर कोणत्या अनावश्यक अशा गोष्टीसाठी ही मालिका मी सोडणार नाही. या मालिकेचा प्रवास हा खूप छान आहे. त्यातून मला आनंद मिळत आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे. त्यांचं हे प्रेम, आदर मी वाया घालवू इच्छित नाही.’

दिलीप जोशी आणि नियती

दिलीप जोशी यांनी केवळ टीव्ही मालिकांतच नाही तर सिनेमांतही काम केले आहे. ‘मैने प्यार किया’, ‘हमराज’ सारख्या सिनेमांतही त्यांनी काम केलं आहे. आता देखील त्यांना सिनेमांत काम करण्याची इच्छा आहे. त्याबाबत त्यांनी सांगितले की, ‘मला अभिनय क्षेत्रात काही चांगलं काम करायचं आहे. बरेच आयुष्य अजून बाकी आहे. सध्या जे सिनेमे येत आहेत, त्यांचे विषयही वेगळे आणि चांगले आहेत. त्यामुळे मला जर कधी अशा चांगल्या सिनेमाची ऑफर आली तर मी नक्कीच स्वीकारणार. सध्या माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे, ते मी छान एन्जॉय करत आहे.’

१० वर्ष सुरू होता घटस्फोटाचा खटला; अर्नाल्ड आणि मारिया विभक्त

दिलीप जोशी यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे तर अलिकडेच त्यांची मुलगी नियती जोशी चं लग्न झालं. सिनेलेखक अशोक मिश्रा यांचा मुलगा यशोवर्धन मिश्रा याच्याशी नियतीचं लग्न झालं. लेकीच्या लग्नावेळी दिलीप जोशी खूपच भावुक झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर मुलीच्या लग्नाचे फोटो शेअर करत एक भावुक नोट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी जावई यशोवर्धन याचे कुटुंबामध्ये स्वागत केलं होतं.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here