हायलाइट्स:

  • भाजपच्या अनेक नेत्यांचंही टेन्शन वाढलं
  • राधाकृष्ण विखे पाटलांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट
  • विखेंच्या संपर्कात आले होते अनेक भाजप नेते

अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं आहे. कारण काल सायंकाळी विखे पाटील यांनी भाजपच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. (अहमदनगर कोरोना बातम्या अपडेट)

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती आज सोशल मीडियातून दिली आहे. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. काल, बुधवारी नगरमध्ये विखे पाटलांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.

‘नारायण राणेंचे चिरंजीव निष्पाप आहेत तर लपून का बसलेत?’

‘आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची करोना चाचणी करावी व काळजी घ्यावी,’ असं ट्वीट विखे यांनी केलं आहे. त्यामुळे आता सर्वांचीच चिंता वाढली आहे.

PM मोदींनी खरंच शरद पवारांना सत्तास्थापनेची ऑफर दिली?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचा काल विवाह सोहळा होता. त्यासाठी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या गर्दीसह हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आज सकाळी विखे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

एका बाजूला करोनासंबंधी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे, तसंच सामान्यांना विवाह समारंभासह अन्य कार्यक्रमांवरही निर्बंध घातले जात आहेत. तर दुसरीकडे काही नेते मंडळींचे शाही विवाह सोहळे सुरूच आहेत. याबद्दल नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातून करोनाचा प्रसार वेगाने झाला तर कोणाला जबाबदार धरणार? असा प्रश्नही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here