हाँगकाँग :

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांवर चीनकडून दडपशाहीची कारवाई केली जातेय. हाँगकाँग पोलिसांनी गुरुवारी एका लोकशाही समर्थक न्यूज वेबसाईटशी निगडित दोन जणांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

स्टँड न्यूज‘ या वेबसाइटनं एक आदल्या दिवशी पोलिसांकडून कार्यालयावर छापे टाकल्याचं सांगितलं होतं. या छापेमारीनंतर सात जणांना अटक करण्यात आली असून यापुढे आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडिया खात्यांवर कोणत्याही प्रकारे नवीन सामग्री अपलोड करता येणार नाही, ही वेबसाईट बंद केली जात असल्याचं तसंच आपल्यावर दडपशाहीचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं होतं.

अटक करण्यात आलेल्यांत स्टँड न्यूजचा एक माजी संपादक तसंच एका सद्य संपादक चुंग पुई-कुएन आणि पॅट्रीक लॅम यांचाही समावेश होता. यामध्ये चार महिलांचाही समावेश होता. याशिवाय गायक डेनिस हो आणि माजी खासदार मार्गारेट न्गो यांनाही बुधवारी अटक करण्यात आली. सोबतच संस्थेशी निगडीत वस्तू आणि संपत्तीही जप्त करण्यात आली. संस्थेशी निगडीत लोकांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली.

कोण आहे ‘बिटकॉईन’चा शोधकर्ता? एलन मस्कनं रहस्यावरून हटवला पडदा…
‘राफेल’चा धसका, पाकची चीनकडून J-10C लढावू विमानांची खरेदी

३३ वर्षीय आणि ५२ वर्षीय अशा दोन पुरुषांवर देशद्रोही सामग्री प्रकाशित करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांनी एका पत्रकाद्वारे दिलीय. या दोन्ही आरोपींची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. मात्र, स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, स्टँड न्यूजचे संपादक चुंग पुई-कुएन आणि पॅट्रीक लॅम या दोघांविरुद्ध ही कारवाई करण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अॅपल डेली‘ या लोकशाही समर्थक वृत्तपत्राचे माजी संपादक चॅन पुई-मॅन आणि चुंग यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. न्यूज पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलंय. ‘अॅपल डेली’ बंद झाल्यानंतर हाँगकाँगमध्ये थेट विरोध आणि टीका करणारा शेवटच्या मीडिया संस्थेपैंकी एक असलेल्या ‘स्टँड न्यूज’च्या कार्यालयावरही बुधवारी करावाई करण्यात आली.

Sex Trafficking: अल्पवयीन मुलींचा ‘सेक्स ट्राफिकिंग’साठी वापर, दोषी ब्रिटिश महिलेला कठोर शिक्षा
‘ओमिक्रॉनला घाबरू नका, हा तर केवळ हंगामी सर्दीकारक विषाणू’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here