हायलाइट्स:

  • गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच
  • पोलीस कर्मचारी अटकेत
  • कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या तक्रारदार आणि त्याच्या आईला अटक न करता थेट कोर्टात आरोपपत्र दाखल करुन त्यांना मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही घटना इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात झाली. (कोल्हापूर लाच प्रकरण)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील तक्रारदार आणि त्यांच्या आईविरोधात इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक पांडुरंग लक्ष्मण गुरव करत होते. तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक गुरव याने तक्रारदारांकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने नाईलाजस्तव एक हजार रुपये पोलीस गुरव याला दिले. त्यानंतर गुरव याने गुन्ह्यात तक्रारदार आणि त्याच्या आईला अटक न करता थेट दोषारोपपत्रासह कोर्टात हजर करुन त्यांना मदत करण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

चोरट्यांचे भलतेच धाडस; थेट बँक मॅनेजरच्या घरावर दरोडा टाकला,

पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यात सरकारी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यानुसार आज गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहापूर कोरोची रस्त्यांवर सापळा लावला. पोलिसांनी तक्रारदारांकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक पांडुरंग गुरव याला रंगेहाथ पकडले.

दरम्यान, पोलीस नाईक गुरव हा सध्या भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे राहात असून त्याचे मूळ गाव राधानगरी तालुक्यातील पिरळ आहे. पोलीस उपअधीक्षक अदिनाश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई यांनी या कारवाईत भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here