हायलाइट्स:
- पोलिसांवर जमावाचा हल्ला
- पोलिसांनी केला हवेत गोळीबार
- घटनेत दोन पोलीस जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्वधर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. शक्ती सिंह नावाचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी साथीदारांच्या मदतीने या परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरिकांची ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक शक्ती सिंह याला पकडायला गेले.
पोलीस ताब्यात घेण्यासाठी आल्याचं लक्षात येताच शक्ती सिंह याने समाजातील नागरिकांना एकत्र करून पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यानंतर तेथील नागरिक पोलिसांवर चालून आले. त्यामुळे पोलिसांनी स्वरक्षणार्थ पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि शक्ती सिंह याला पोलिासांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.