औरंगाबाद बातम्या लाईव्ह: चिंताजनक! मुंबईनंतर ‘या’ जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतेय, २ दिवसांची धक्कादायक आकडेवारी समोर – after mumbai the number of patients is increasing in aurangabad district
औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजधानीत करोनाचा आलेख चालला असताना, आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्येदेखील करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांची आकडेवारी औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पाडणारी आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी (गुरुवारी ) १६ नव्या करोना रुग्णाची वाढ झाली आहे. ज्यात मनपा हद्दीतील १४ रुग्ण असून ग्रामीण भागातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे एक दिवसांपूर्वी सुद्धा ( बुधवारी ) जिल्ह्यात १६ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहता औरंगाबादमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. New Year Guidelines : नागरिकांनो, नववर्षाचे स्वागत घरीच करा; पालिकेचे नियम वाचलेत का? दरम्यान, या सगळ्यावर घाबरून न जाता आपल्या आरोग्या काळजी घ्या, करोनाच्या नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा.
थर्टी फर्स्टचा जल्लोष घरीच!
करोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी थर्टीफर्स्टचा जल्लोष घरीच साजरा करावा असे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तर रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी असल्याने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी राहणार आहे. तर थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ६० उपनिरीक्षक, ९०० पोलीस असा बंदोबस्त राहणार असून ३९ ठिकाणी नाकेबंदी केली जाणार आहे.