औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्वच पेट्रोल पंप गुरुवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान अचानक बंद झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तर पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या वाहनधारकांची रस्त्यावर लांबच रांगा लागल्याचे चित्र अनेक पेट्रोल पंपावर पाहायला मिळाले. कारवाईसाठी आलेल्या महानगरपालिका पथक आणि पेट्रोल पंप चालकात झालेल्या वादानंतर पेट्रोल पंप असोसिएशनने काही काळ पेट्रोल पंप बंद केल्याने हा सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.

झालं असे की, गुरुवारी साडेअकराच्या दरम्यान क्रांती चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते. यावेळी पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांची लसीकरणाची प्रमाणपत्रे मागितले असता, पंप चालकाने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र दाखवले. याचवेळी एक कर्मचारी कार्यालयात येताना विना मास्क आल्याचा आरोप करत पथकाने पाच हजाराचे दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले. यावरून पंप चालक आणि पथकात वाद झाला.

New Year Guidelines : नागरिकांनो, नववर्षाचे स्वागत घरीच करा; पालिकेचे नियम वाचलेत का?

वाद सुरू असतानाच तुम्हाला पंप बंद करायचा का? असा प्रश्न पपं चालकाने विचारला. यावर तुम्हाला काय करायचं करा? असं उत्तर पथकातील कर्मचाऱ्यांनी दिल्याने,पंप चालकाने पेट्रोल विक्री बंद करण्याचे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच शहरातील अनेक पेट्रोल पंप सुद्धा बंद करण्यात आले. त्यामुळे जवळपास तासभर शहरातील पेट्रोल पंप बंद होती.

वाहनधारकांचा संताप पाहताच….

पेट्रोल पंप चालक आणि महापालिका पथकात झालेल्या वादानंतर शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद करण्यात आले. त्यामुळे पेट्रोलसाठी आलेल्या वाहनधारकांची मोठी रांग रस्त्यांवर पाहायला मिळाली. तासभर चाललेल्या गोंधळानंतर अखेर वाहनधारकांनी आक्रमक पवित्रा घेताच महापालिका पथकाने पेट्रोल पंपावरून काढता पाय घेतला, तर लोकांचा रोष पाहता पंप चालकांनी सुद्धा पुन्हा पेट्रोल पंप चालू केले.

चिंताजनक! मुंबईनंतर ‘या’ जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतेय, २ दिवसांची धक्कादायक आकडेवारी समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here