औरंगाबाद : गेल्या एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. पण संपात पडलेल्या फुटीमुळे अनेक कर्मचारी कामावर हजर राहत असल्याने पुन्हा एकदा लाल परीचे चाक फिरताना पाहायला मिळत आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ९७ बसने तब्बल ८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर होता. पण महिना उलटूनही हाती काहीच पडत नसल्याने आणि संपात पडत असलेल्या फुटीमुळे अनेक वाहक- चालक कामावर हजर होत आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९७ बसने ३१३ फेऱ्या मारल्या, ज्यात ८ हजार ११० प्रवाशांनी प्रवास केला.

New Year Guidelines : नागरिकांनो, नववर्षाचे स्वागत घरीच करा; पालिकेचे नियम वाचलेत का?
कर्मचाऱ्यांना दंडाची नोटीस…

संपातील एसटी कर्मचाऱ्यांवर अनेक दबाव आणून त्यांना कामावर हजर राहण्यासाठी एसटी महामंडळाचकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असताना, आता संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. औरंगाबाद येथील उल्हास चव्हाण यांना लाख रुपायांची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुढील सुनावणी ५ जानेवारीला

मुंबई हायकोर्टात झालेल्या २२ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत कोणताही निर्णय न झाल्याने,पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार असल्याचं कोर्टाने सांगितले होते. त्यामुळे ५ जानेवारीला तरी काही तोडगा निघेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे ५ जानेवारीला हायकोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

चिंताजनक! मुंबईनंतर ‘या’ जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतेय, २ दिवसांची धक्कादायक आकडेवारी समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here