जालना बातम्या लाईव्ह: धक्कादायक! आईने ४ लेकरांसह केली आत्महत्या, ३ मुली आणि एका मुलाला घेऊन शेतात गेली अन्… – mother committed suicide by jumping into a well with her four children jalna news
जालना : जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलत पोटच्या ३ मुली आणि एका मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी वय ३२, भक्ती वय १३, ईश्वरी वय ११, अक्षरा वय ९ व मुलगा युवराज वय ७ अशी आई आणि मुलांची नावं आहेत. अंबड तालुक्यातील घुंगर्ड हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात. काल ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुला मुलीसह सायंकाळी ५.३० शेतातच वेळ घालवला. महाराष्ट्र हादरला! महिला सिंघमला जीवे मारण्याचा प्लॅन, २ भावांनी मिळून ट्रॅकर मागवला आणि… संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाही. रात्र झाली तरी हे ५ जण घरी न परतल्याने अडाणी कुटुंबातील सदस्य यांनी ही आजूबाजूच्या शेतात रात्रभर शोध घेऊन ही सापडले नव्हते. परंतु सकाळीच काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताशेजारच्या गणेश फिसके यांच्या गट नं ९३ मधील विहिरीत या पाचही जणांचे मूतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.
गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उड्या मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ सह कर्मचारी हजर होऊन या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून जाग्यावर श्वविच्छेन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांनी ताब्यात घेतले आहे.