
भाजप नेते इथेच थांबले नाहीत, लैंगिक संबंधांवर आक्षेपार्ह विधान करताना ते पुढे म्हणाले की, ‘कोणीही याला परिभाषीत करू शकलेलं नाही. एखाद्या माणसाने प्राण्याशी संबंध ठेवले तर तो प्राणी येऊन हे परिभाषीत करणार आहे का? नक्की हे चाललंय तरी काय?’
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि सोशल मीडियावरील युझर्सने त्यांना फटकारले. दुसरीकडे, सोनम कपूरने त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं. सोनम कपूर ची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. सोनम ही त्या स्टार्सपैकी एक आहे जी सुरुवातीपासून LGBTQIA समुदायाला सपोर्ट करत आली आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात सोनमने लेस्बियनची भूमिका साकारली होती.
सोनम कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे. सोनम कपूरने स्कॉटलंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शोम माखिजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात सोनम कपूरशिवाय विनय पाठक, पूरब कोहली आणि ललित दुबे दिसणार आहेत.