अमरावती : मरणापूर्वी जर कोणी आपली तेरवी करत असेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असं झालं आहे अमरावती शहरात… एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांनी आज आपली जिवंतपणी तेरवी साजरी केली आहे.  विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने ‘मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम’ अशी पत्रिका ही वाटली होती.

अमरावती येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुखदेव डबरासे यांनी एक पत्रिका छापली.  ज्यामध्ये लिहलं की, मला सेवानिवृत्त होऊन 5 वर्ष सहा महिने होत आहे. त्यामुळे मी सेवानिवृत्त होऊन पेन्शनचा आनंद घेतल्यामुळे पुढील आयुष्य जगण्याची इच्छा नाही.  तसेच माझा मुलगा बाहेर गावी नोकरीला आहे. मला केव्हा मरण येईल याची शाश्वती नसल्याने हा कार्यक्रम स्वेच्छेने करत असल्याचं सांगत त्यांनी पत्रिका वाटली आणि सगळ्यांना एक धक्का दिला.

मुलगा मुंबईत बॉक्सिंग कोच आहे. एक मुलगी शिक्षिका, तर धाकटी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन खात्यात रुजू होणार आहे. कुठलाही ताण नाही, कर्ज नाही, आरोग्य ठणठणीत आहे. पाच वर्षांपूर्वी पोलीस खात्यातून निवृत्त झालो.  पण केव्हा मृत्यू येईल, हे माहित नाही. या जाणिवेतून अमरावतीच्या सेवानिवृत्त उपनिरीक्षक सुखदेव डबरासे यांनी चक्क स्वत:च्या तेरवीचे आयोजन करून माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला नक्की या’ अशी साद घातली.  तेरवीचा कार्यक्रम त्यांनी स्वत:च्या  घरी केला याला  घरच्यांचा विरोध झाला. पण नंतर त्यांची सुखदेव डबरासे यांनी समजूत घातली आणि हा कार्यक्रम पार पाडला.

एक दिन जाना है, ते कुणालाच चुकले नाही. माझे काही मित्र तर सेवानिवृत्तीनंतर एक ते दीड वर्षातच स्वर्गवासी झाले. मृत्यूनंतर तेरवी केली जाते. अंत्यसंस्काराला आप्तस्वकीय जमतात. मात्र, ते पाहायला आपण नसतो. त्यामुळे जिवंतपणीच गेट टू गेदर करायचे, आप्तांना, मित्रांना बोलवायचे, त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायच्या. त्यातून डोक्यात एक विचार चमकून गेला अन् स्वत:ची तेरवी करण्याचा निर्णय घेतला. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुखदेव डबरासे यांनी या तेरवी मागील भूमिका मांडली.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here