औरंगाबाद : सिल्लोड रोडवर असणाऱ्या मोढा गावाजवळ शुक्रवारी पुन्हा एकदा दुचाकीस्वार आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. मात्र, याचवेळी तेथून जाणाऱ्या महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांची मदत करत त्यांना आपल्या स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहचवले.

अधिक माहिती अशी की, सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील मोढा फाटा येथे शुक्रवारी (ता. ३१) दुचाकी व चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. डोक्यातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्याला तात्काळ उपचाराची गरज होती. त्याचवेळी या ठिकाणाहून जात असलेले महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने ताफा थांबवित स्वतःच्या ताफ्यातील वाहनातून गंभीर झालेल्या तरूणास सिल्लोड येथे उपचारासाठी पाठविले. तसेच संबंधित यंत्रणेला सूचना सुद्धा दिल्या.

खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
मोढा फाटा बनला ‘अपघात स्पॉट’

सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरील मोढा फाटा येथे अपघाताची मालिका सुरूच असून, गुरुवारी झालेल्या अपघातात मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्या अपघातानंतर गुरूवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन एक जण गंभीर झाला होता. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळच्या सुमारास पुन्हा दुचाकी व टेम्पोचा अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’; महामंडळाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here