औरंगाबाद : औरंगाबादमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याची चीड आणणारी घटना समोर आली आहे. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या प्रकरणी शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम भावाला अटक केली आहे. (Aurangabad crime Abuse of a minor girl by her brother The victim is 7 months pregnant)

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गोलवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्याच मावस भावाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. मात्र भीतीपोटी तरुणीने घरच्यांना याबाबत सांगितले नाही. पण पीडित तरुणीला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी २९ डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता ही सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला.

खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
तसेच पीडितेची सात महिन्याची गरोदर असताना घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. या सर्व प्रकाराने मुलीच्या कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मावस भावानेच आपल्यावर अत्याचार केल्याच तिने सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत, आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Aurangabad crime Abuse of a minor girl by her brother The victim is 7 months pregnant)

Breaking : पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
(औरंगाबाद गुन्हा अल्पवयीन मुलीवर तिच्या भावाकडून अत्याचार पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here