गोंदिया : ३१ डिसेंबर नववर्षाची पार्टी साजरी करणं एका २८ वर्षीय युवकाच्या जीवावर बेतलं आहे. पार्टी दरम्यान पाण्याचा मोह न आवरल्याने मौज मस्तीसाठी नदी पात्रात उतरलेल्या युवकाच्या बुडून मृत्यु झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गाढवी नदी पात्रात घडली आहे. राहुल पंढरी काळसर्पे वय २८ वर्षीय युवकाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महागाव येथील राहुल काळसर्पे हा आपल्या मोठ्या भाऊ रवी पंढरी काळसर्पे व काही मित्रांसोबत केशोरी येथून जवळच असलेल्या खोळदा येथे नववर्षाच्या पुर्वसंध्येला पार्टी करिता आले होते. या दरम्यान जवळून वाहत असलेल्या नदीत उतरण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
जेवन बनवून राहुल हा आपल्या भावा व मित्रासोबत मौज मस्ती करण्यासाठी गाढवी नदीच्या पात्रात उतरून नदी पाहण्याचा आनंद घेऊ लागला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल खोल असलेल्या डोहात अडकला आणि बुडू लागला. राहुल पाण्यात दीसेनासा झाल्याने त्याच्या मोठ्या भावाने गावातील लोकांना हाक मारली. परंतु यात फार उशीर झाला होता.

लोकांच्या मदतीने शोध कार्य सूरु केले असता रात्री उशिरा त्याच्या मृतदेह काही अंतरावर आढळला. सदर घटनेची माहिती मिळताच अर्जुनी/मोरगाव आणि केशोरी पोलीस घटनास्थळी दाखल होते. मृताचे शव शवविच्छेदनाकरिता हलविले असून सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन केशोरी येथे दाखल करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्व संध्येला एका युवकाच्या मृत्यू झाल्याने महागावात शोककळा पसरली आहे.

Breaking : पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here