हायलाइट्स:

  • मुंबईत हळूहळू वाढतोय ओमिक्रॉनचा संसर्ग
  • बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही
  • करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने होतोय फैलाव

मुंबई: करोना (Corona) विषाणूच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉननं (ओमिक्रॉन) धास्ती वाढवली आहे. मुंबईत हळूहळू घातक व्हेरियंट डेल्टाऐवजी आता ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव वाढत आहे. जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालावरून हा अंदाज वर्तवला जात आहे. ओमिक्रॉनने ‘एन्ट्री’ केल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाकडून हाय-रिस्क देशांतून येणाऱ्या प्रवाशांसह २१ डिसेंबरपासून मुंबईत कोविड १९ ची बाधा झालेल्या रुग्णांचे नमुनेही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात होते.

शुक्रवारी पाचव्या जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालामध्ये मुंबईत ओमिक्रॉनचा आलेख वाढताना दिसतो आहे. २८२ जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील ५५ टक्के नमुने अर्थात १५६ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या २८२ नमुन्यांपैकी ८९ जणांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि ३७ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला.

विमानतळावर गर्दी ;वर्षाखेरीस ४ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा
मुलांच्या लसीकरणाची आजपासून नोंदणी

डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनचा अधिक वेगाने फैलाव

मिळालेल्या माहितीनुसार, करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने फैलावतो आहे. मुंबईत त्याचा प्रादूर्भाव अधिक वेगाने वाढत आहे. मुंबईत आता खबरदारी घेतली जात आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ओमिक्रॉन प्रभावित देशांमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करून त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत होते. मात्र आता कोविड १९ संसर्ग झालेल्या मुंबईकरांचे नमुनेही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी कस्तुरबा रुग्णालयाच्या नेक्स्ट जनरेशन लॅबमध्ये पाठवण्यात येत आहेत. ते म्हणाले की, ‘२१ आणि २२ डिसेंबरला ३०० हून अधिक नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. प्राप्त अहवालात ३७ टक्के नमुने म्हणजेच १४१ जणांना करोना संसर्ग झाला होता. आता सातव्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. २८२ नमुन्यांपैकी १५६ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन विषाणू आढळला आहे. या वेळी ३७६ नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २८२ नमुने हे मुंबईतून पाठवण्यात आले होते. शुक्रवारी याचा अहवाल प्राप्त झाला. ८९ नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि ३७ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळले आहे.’

किनाऱ्यांवर प्रवेशबंदी; चौपाट्या, प्रेक्षणीय स्थळे,मैदानावर १५ जानेवरीपर्यंत निर्बंध
१८ पेक्षा कमी वयाचे १६ रुग्ण ओमिक्रॉनबाधित

२८२ नमुने जे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांचे ३२ नमुने होते. त्यातील १६ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तर १२ जणांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि चार जणांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांनी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

coronavirus updates in maharashtra: राज्यात करोनाचा विस्फोट; आज ८ हजार रुग्णांचे निदान, तर ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here