मुंबई: राज्यात आतापर्यंत १३० जणांना करोनाची लागण झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १८जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यात एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन ९५ मास्क, ट्रिपल लेअर मास्क, पीपीई, व्हेंटिलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनासामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडी…

LIVE अपडेट्स…

>> आज अकरा वाजता फेसबुक लाइव्हद्वारे शरद पवार साधणार राज्यातील जनतेशी संवाद

>> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १३० वर

>> नाशिकमधील सर्व दर्गा आणि मशिदी बंद असून, आज ‘जुम्मा’निमित्तचे सामूहिक विशेष नमाजपठण रद्द करण्यात आलंय; शहर-ए-खतीब नाशिक यांची माहिती

>> राज्यात आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी

>> खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

>> पुण्यात लॉकडाऊनमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू

>> यवतमाळमध्ये महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमेवर ट्रकमधून जाणाऱ्या १५० कामगारांना ताब्यात घेतले

>> मुंबईत तीन वर्षांच्या मुलीचा ‘करोनालढा’ यशस्वी

वाचा:

>> कोल्हापुरात करोनाचे दोन रुग्ण सापडले

>> करोनामुळे मुंबईत काल दोघांचा मृत्यू

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here