हायलाइट्स:

  • ठाण्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांची धडक कारवाई
  • चारशेहून अधिक मद्यपींविरोधात कारवाईचा बडगा
  • वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे भोवले
  • वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान केली कारवाई

ठाणे : नवीन वर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. या जल्लोषादरम्यान अनेक जण मद्यपान करतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते, तर कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागतो. याला आळा बसावा यासाठी पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि अपघात कमी व्हावे यासाठी विशेष पथके तैनात केली जातात. काल देखील ठाणे वाहतूक पोलीस विभागाकडून आयुक्तालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान ४४३ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तर यावर्षी पोलीस आयुक्तालयात एकही गंभीर अपघात झालेला नाही.

दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून जल्लोष साजरा केला जातो. अनेक जण मद्यपान करतात. अनेक ठिकाणी अपघात देखील होतात. एकीकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, अपघात टळावेत, तर दुसरीकडे करोनाचे कडक निर्बंध पाळावेत यासाठी पोलीस सज्ज होते. नागरिकांकडून कुठल्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी काल ३१ डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे ठाणे आयुक्तालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी दारू पिऊन धिंगाणा करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी संपूर्ण आयुक्तालय परिसरात वाहतूक पोलिसांची १८ पथके तैनात करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांकडून काल ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल ४४३ जणांवर कारवाई केली आहे. या ४४३ मध्ये नियम १८५ अंतर्गत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २९७ मद्यपींवर, तसेच नियम १८८ अंतर्गत मद्यपींसोबत दुचाकीवर बसलेल्या १३१ सहकारी आणि एकाच गाडीवर तीन जण प्रवास करणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोमवारी ३ जानेवारी रोजी कोर्टात हजर केले जाणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून दंड कोर्टाकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच यावर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात गंभीर अपघात होऊन कुठलीही गंभीर दुखापत किंवा कुठल्याही वाहन चालकाला आपला जीव गमावावा लागला नाही. ही एक दिलासादायक बाब.

Kalyan Crime News : रिक्षात ५ प्रवासी बसले होते, अचानक त्यातील एकाने रिक्षाचालकाच्या मानेवर….
Omicron In Maharashtra : ओमिक्रॉनची लाट थोपवणार; महाराष्ट्र सरकारची ‘अशी’ असेल ‘ब्ल्यू प्रिंट’

वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालवणे, शहरात बेशिस्तपणे गाडी चालवणे, दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी दुचाकीवरून प्रवास करणे, विनापरवाना आणि विना कागदपत्रे वाहन चालवणे, तसेच विना हेल्मेट वाहन चालवणे आदींवर कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या येऊर या ठिकाणी दरवर्षी गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ठाण्यातील येऊर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच शहरातील मासुंदा तलाव, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी चौक, तीन हात नाका चौक, कोपरी, मुलुंड चेकनाका, वागळे इस्टेट तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून शहर पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी लावण्यात आली होती.

महिला रिक्षाचालकांना मिळणार हक्काचे स्टँड
उल्हासनगरमधील ‘छमछम’ बंद, ८० वेळा कारवाई, अखेर महापालिकेनं ‘चांदनी डान्सबार’ला ठोकलं टाळं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here