राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे.

राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
हायलाइट्स:
- राज्यात शुक्रवारी ८,०६७ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले
- यात मुंबईतील पाच हजार ४२८ नवीन बाधितांचा समावेश आहे
ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील करोना परिस्थिती गंभीर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
गेल्या २४ तासांत ८,०६७ नव्या रुग्णांची नोंद
राज्यात शुक्रवारी ८,०६७ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. यात मुंबईतील पाच हजार ४२८ नवीन बाधितांचा समावेश आहे. यावरून राज्यात नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसभरात १,७६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात आठ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ओमायक्रॉनबाधित चार रुग्ण आढळले असून ते वसई-विरार, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि पनवेल परिसरात प्रत्येकी एक बाधित आहे. ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ९७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५ लाख ७४ हजार ८५९ इतकी झाली. दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११ हजार ६२० पर्यंत पोहोचला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून