हायलाइट्स:

  • चिपळूणमध्ये अडीच लाखांचा वाळूसाठा जप्त,
  • जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा महसूल विभाग करणार लिलाव
  • महसूल विभागाच्या भरारी पथकाने केली धडक कारवाई

चिपळूण: वाळू उत्खननाचा परवाना मिळण्याआधीच खाडीत उत्खनन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गोवळकोट धक्का येथील कालुस्ते पुलाखाली सुमारे ३५ ब्रास विनापरवाना वाळू साठा जप्त करण्यात आला. हा वाळूसाठा शासकीय जागेत ठेवण्यात आला होता. त्यामुळे महसूल विभागाकडून पुढील आठवड्यात या वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी दिली.

चिपळूण येथील महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी रात्री १० वाजता ही कारवाई केली. या कारवाईत अडीच लाख किंमतीचा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी रात्री गोवळकोट येथे अचानक धाड टाकली. यावेळी कालुस्ते पुलाजवळ वाळूसाठा आढळला. साधारण ३५ ब्रास इतका हा वाळूसाठा असून त्याचे मोजमाप पहाटे ३ पर्यंत सुरू होते. त्यानंतर हा साठा उक्ताड येथील शासकीय गोदामाच्या ठिकाणी नेण्यात आला. ही वाळू कोणी आणली व त्यामागे कोण सूत्रधार आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी दंडात्मक कारवाई झालेली नाही. मात्र लवकरच या वाळूचा लिलाव महसूल विभागाकडून केला जाणार आहे.

Thane : मलनिःस्सारण प्रकल्पाच्या टाकीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू
थर्टी फर्स्टला ठाण्यात ४४३ तळीराम आणि बेशिस्तांवर पोलिसांची कारवाई

प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी उमेश गिज्जेवार, तसेच गोवळकोट, मालदोली व कापसाळ येथील तलाठ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान या प्रकारामुळे तालुक्यातील अवैधरीत्या वाळू उत्खनन होत असल्याचे स्पष्ट झाले असून, ही वाळू सार्वजनिक जागेत मिळाली असली तरी या मागचा खरा सूत्रधार कोण हे गुलदस्त्यातच आहे.

वडिलांनी केली मुलाची हत्या
महिला रिक्षाचालकांना मिळणार हक्काचे स्टँड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here