मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या कुटुंबासह दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अनुष्का गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आई झाली. या ११ जानेवारीला ती मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवसही साजरा करणार आहे. अनुष्का अशा पालकांपैकी एक आहे जिला इतक्यात आपल्या मुलीचा चेहरा सार्वजनिकरित्या लोकांना दाखवायचा नाही.

कंगना रणौतने घेतला ‘राहु- केतू’ चा आसरा, म्हणे FIR पासून वाचव

मुलीची गोपनीयता ठेवण्याचा विराट कोहली आणि अनुष्का आटोकाट प्रयत्न करतात. याचमुळे तिने अद्याप वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. अनुष्का शर्माच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये वामिकाचा आवाज चाहत्यांची मनं जिंकत आहे.


अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मुलीचा हा व्हिडिओ शेअर केला. यात वामिका दिसत नसली तरी तिचा गोड आवाज ऐकू येत आहे. वामिका आई-आई म्हणत बोलण्याचा प्रयत्न करताना ऐकू येतं.

अनुष्का शर्मा स्टेटस

Photo- करोनाने मलायका अरोराला केलं अर्जुन कपूरपासून दूर

हे शेअर करताना अनुष्काने २०२१ ची संध्याकाळ अतिशय सुंदर पद्धतीने घालवल्याचं म्हटलं. तसेच अनुष्काने इन्स्टा स्टोरीवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोही शेअर केले. दरम्यान, विराट आणि अनुष्का सुरुवातीपासूनच त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत आणि छायाचित्रकारांनाही तसे न करण्याची विनंती ते वेळोवेळी करतात. विराट आणि अनुष्का आपल्या मुलीसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना होत असताना वामिकाचे काही फोटोही समोर आले होते. यानंतर अनुष्काने छायाचित्रकारांना फोटो न काढण्याची विनंती केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here