औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रमानगर भागात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला पत्नीच्या नातेवाईकांकडून डोळ्यात तिखट टाकून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यवती रमेश शिरसाठ (३८, रा. रमानगर) असे जखमी महिलेचे नाव असून, रमेश शेषराव शिरसाठ (४२) असे पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश व सत्यवती यांच्यात अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे नेहेमीच्या वादाला कंटाळून दोघांच्या मर्जीने घटस्फोट झाला होता. मात्र, त्यानंतरही जुनं सगळं विसरून पुन्हा एकदा नातं सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण एक महिन्याभरापूर्वी दोघांनेही पुन्हा वेगळे होण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे रमेश हे राहत असलेल्या परिसरातच सत्यवती या जुन्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत राहण्यासाठी गेली. हे रमेशला यांना मान्य नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात असलेल्या रमेश यांनी सत्यवती यांच्या खोलीत जात थेट पोटात चाकू खुपसला.

सर्दी-खोकल्याच्या साथीमुळे करोना चाचणीही पॉझिटिव्ह, ‘या’ जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढली
यावेळी बहिणीच्या मदतील धावून आलेल्या सत्यवती यांच्या भावावर सुद्धा रमेश यांनी चाकूने वार केले. त्यामुळे यावेळी संतापलेल्या सत्यवती यांच्या कुटुंबातील लोकांनी रमेश यांच्या डोळ्यात तिखट टाकत बेदम मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणी दोघांच्याही तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पुत्राने विद्यार्थिनीची ‘आयटम’ म्हणून काढली छेड; मुलीने शिकवला ‘असा’ धडा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here