औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील एमजीएम विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस पुत्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून प्रतीक राजेश भोटकर (वय २०, रा. रायगडनगर), पीयूष चंद्रकांत देशमुख याच्यासह आणखी एकाच्या विरोधात विनयभंगासह मारहाण धमकी देण्याचा गुन्हा सिडको पोलिसात नोंदविण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमजीएम विद्यापीठातील एक विद्यार्थिनी आपल्या तीन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी विद्यापीठासमोरील एका हॉटेलमध्ये गेली होती. त्याचवेळी या ठिकाणी पोलीस पुत्रासह त्याचे दोन मित्रही आलेले होते. तर विद्यार्थिनीकडे पाहून पोलीस पुत्राने ‘आयटम’ म्हणत वाईट नजरेने पाहत इशारा केला. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने सोबतच्या मित्रांना दिली. त्यामुळे विद्यार्थिनीच्या मित्रांनी पोलीस पुत्रासह त्याच्या मित्रांना या प्रकाराविषयी जाब विचारला. तेव्हा त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थिनीने सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

सर्दी-खोकल्याच्या साथीमुळे करोना चाचणीही पॉझिटिव्ह, ‘या’ जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढली
पोलीस पुत्राचीही तक्रार….

तर मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस पुत्राने सुद्धा संबंधित विद्यार्थिनीच्या मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार केली होती. आपल्या भावाला भेटण्यासाठी गेलो असता, अनोळखी आरोपींनी गाडीचे कारण सांगून दमदाटी करून मारहाण केल्याचं या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलीस पुत्राच्या तक्रारीवरून तीन अनोळखी मित्रांच्या विरोधात मारहाण, धमकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here