हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील ईसापुर धरणाजवळ गेल्यावर वयोवृद्धाचा धरणाच्या काठावरून घसरल्याने वयोवृद्ध इसम धरणाच्या पाण्यात बुडाला होता. सध्या धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात असल्याने मृतदेह सापडत नव्हता अखेर पाच दिवसानंतर गोताखोर समशेर पठाण व पोलीस कॉन्स्टेबल भारत घ्यार यांच्या अथक परिश्रमामुळे पाच दिवसानंतर धरणाच्या पाण्यातून वृद्धाचा मृतदेह काढण्यास यश मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेकरू काळू चव्हाण वय वर्ष ८५ राहणार सावरगाव बंगला, हे २९ डिसेंबर रोजी पासून घरातून बाहेर गेले असता ते परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शोधा शोध सुरू केली. पण ते कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात हरवल्याची नोंद केली होती.

यानंतर ते इसापूर धरणाच्या काठावर असता त्यांचा पाय घसरून पाण्यामध्ये बुडाले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यांचे शोधकार्य सुरू होते. यानंतर अखेर पाचव्या दिवशी कोतवार समशेर पठाण यांच्यासह सहकाऱ्यांनी पाचव्या दिवशी धरणाच्या पात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.