औरंगाबाद : पोटच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी व ४० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे साधी कैद अशी शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. निंबाळकर यांनी हा निकाल दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी २०१९ रोजी रात्री दहा वाजता पीडिता एकटीच घरी असताना नराधम बापाने घराची आतून कडी लावून घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तर त्याआधी आरोपीची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेल्यावर नराधमाने मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

पोलीस पुत्राने विद्यार्थिनीची ‘आयटम’ म्हणून काढली छेड; मुलीने शिकवला ‘असा’ धडा…
न्यायालयात सरकारी वकील एस. टी. शिरसाठ यांनी पीडिता, तिची आई फिर्यादी व डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष नोंदविली. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरल्याने आरोपीला पोस्को कलम ४ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद तसेच पोस्को कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी, ४० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद याप्रमाणे शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपास अधिकारी साधना आढाव यांनी केलेला तपास आणि पुरावे महत्वाचे ठरले.

खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here