औरंगाबाद : मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय फक्त मुंबईपुरताच का ? ,असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. तर ही योजना हळूहळू सर्वच शहरात राबवली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. लसीकरणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले असता देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला.

सुभाष देसाई यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला, यावेळी ते पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, पाचशे चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुंबईने घेतला आहे. कर माफीची ही योजना हळूहळू सर्वच शहरात राबवली जाईल. इतकंच नाहीतर औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात देखील ही योजना राबवता येईल असे संकेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहे.

पोलीस पुत्राने विद्यार्थिनीची ‘आयटम’ म्हणून काढली छेड; मुलीने शिकवला ‘असा’ धडा…
विरोधकांची टीका…

मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिली होती. त्यानंतर या मुद्यावरून भाजप नेत्यांनी टीका करत, हा निर्णय फक्त आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला असल्याचा आरोप केला होता. तर मुबंई प्रमाणे इतर महानगरपालिका हद्दीत सुद्धा असा निर्णय का घेतला जात नाही, असाही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here