हायलाइट्स:

  • सलमान खानने आजही बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर
  • सलमानने या अभिनेत्रीमुळे केले नाही लग्न
  • बिग बॉसच्या कार्यक्रमात केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान ५६ वर्षांचा झाला असला तरी आजही तो हिंदी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. सलमानच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मुली आल्या, अनेकींसोबत त्याचं नावही जोडलं गेलं, परंतु कोणतंच नातं लग्नापर्यंत गेलं नाही. त्यामुळेच आजही सलमान आणि त्याचं लग्न हा इंडस्ट्रीतील सर्वात मोठा चर्चेचा विषय असतो.

एकताला करोनाची लागण, डेलनाज ईराणीही निघाली पॉझिटिव्ह

सलमानला लग्नाबद्दल विचारलं असता तो फक्त हसतो आणि उत्तर देणं टाळतो. पण या सगळ्यात सलमानने स्वतः लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं होतं. एका खास व्यक्तीसाठी त्याने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे ती खास व्यक्ती ऐश्वर्या राय किंवा कतरिना कैफ नाही तर ती आहे ओळ.

सलमानने बिग बॉसमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्याने सांगितलं होतं की, बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री रेखा यांच्यामुळे त्याने अद्याप लग्न केलेलं नाही. त्यांच्यामुळेच तो अद्याप ब्रह्मचारी आहे. रेखा त्यांच्या ‘सुपर नानी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी रेखा म्हणाल्या होत्या की, ‘सलमान जेव्हा किशोरवयीन होता तेव्हा त्याला मी आवडायचे. आम्ही तेव्हा एकमेकांचे शेजारी होतो. मी जेव्हा पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकला जायचे तेव्हा तो सायकलवरून माझ्या मागे मागे यायचा. सलमान त्याच्या घराच्या बाल्कनीत उभा राहून माझ्याकडे नेहमी बघायचा. तो माझ्यावर प्रेम करायचा, हे त्यालाही माहीत नव्हते.’

‘तू सुकलेला नाना पाटेकर,’ सलमानने उडवली बिचुकलेची खिल्ली


रेखा पुढे म्हणाल्या की, ‘सलमान त्याच्या मित्रांसोबत माझ्या योग साधनेच्या क्लासमध्येही यायचा. इतकेच नाही तर सलमानने त्याच्या घरच्यांनाही सांगितलं होतं की, मोठा झाल्यावर तो माझ्याशीच लग्न करणार…’ रेखा यांचं हे बोलणे ऐकल्यावर सलमान लाजतो आणि म्हणतो, ‘म्हणूनच कदाचीत माझं अजूनही लग्न झालेलं नाही.’ सलमानच्या या बोलण्यावर रेखा त्याला म्हणतात की, ‘नाही नाही.. तू असं बोल की कदाचित म्हणूनच मी लग्न केलं नाही.’

सलमान खान

सलमान खानचं नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामध्ये संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय पासून कतरीना कैफ यांचा समावेश होता. सलमान आणि संगीता अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. त्या दोघांचं लग्नही होणार होतं, परंतु अखेरच्या क्षणी या दोघांमध्ये दुरावा आला आणि ते एकमेकांपासून दुरावले.

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याचीही खूप चर्चा झाली होती. बॉलिवूडमधील हे दोघे आघाडीचे कलाकार होते. सलमान आणि ऐश्वर्या यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली होती. परंतु या दोघांचेही नाते जेमतेम साडेतीन वर्षे टिकले. या दोघांचे ब्रेकअप झाल्यावरूनही खूप चर्चा झाली. ते विभक्त झाल्यानंतर कधीही एकमेकांसमोर आले नाहीत.

सलमान खान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here