हायलाइट्स:

  • पर्यावरण रक्षणाचा कल्याणमधील गिर्यारोहकांनी दिला संदेश
  • जीवधन-वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग मोहीम केली यशस्वी
  • वानरलिंगी सुळक्यावर पोहोचताच जल्लोष
  • गिर्यारोहकांनी १००० फुटांवर जाऊन दिला पर्यावरण वाचवाचा संदेश

कल्याण : नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन किल्ला आणि त्याच्याच बाजूला सुमारे २०० फुटांवर असलेला वानर सुळका या दोन्ही कड्यांच्या सुमारे १००० फूट उंचावरून झिप्लायनिंगच्या मदतीने कल्याणच्या गिर्यारोहक भूषण पवार आणि नीतेश पाटील यांनी ‘पर्यावरण वाचवा‘चा संदेश दिला

नाणेघाटाच्या पायथ्यापासून ट्रेकिंगला सुरुवात होताच सुमारे एका तासाची पायपीट केल्यावर जीवधन किल्ल्याचे वैभव डोळ्यांसमोर येते. त्याचसोबत किल्याच्या दुसऱ्या कड्यावरून समोर दिसतो तो ४५० फुटांचा वानरलिंगी सुळका. जीवधन किल्ल्याचा माथा गाठण्यासाठी सुरुवातच मुळात ही घनदाट जंगलातून होत असल्याने विविध प्रकारच्या हिंस्त्र प्राण्यांची भीती ही असतेच. या सर्वावर मात करून कल्याणच्या या दोन्ही गिर्यारोहकांनी एक सामाजिक संदेश दिला आहे. झिप्लायनिंग करून वानरलिंगी सुळक्यावर पोहोचताच कल्याणच्या दोन्ही गिर्यारोहकांनी ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश दिला आहे.

नव्या इमारतींमध्ये चार्जिंग स्टेशन सक्तीचे?
एसटी संपामुळे ग्रामीण बेकारी वाढणार

व्हॅली क्रॉसिंग म्हणजे काय?

व्हॅली क्रॉसिंग म्हणजे दोन गडांमधील अंतर हे दोरीला लटकून पूर्ण करणे. जीवधन आणि वानरलिंगीमधील अंतर हे सुमारे २०० फुटांचे असून, जमिनीपासून ते १००० फुटांवर आहे. जराशी जरी चूक झाली, तर सरळ दरीत पडून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा जोखमीच्या मोहिमेत सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाते. राज्यात ठिकठिकाणी असलेल्या गडांवर काही जणांनी आपल्या स्वार्थासाठी उत्खनन करून तिथलं पावित्र्य धोक्यात आणले आहे. पर्यावरण धोक्यात घालून आपणच आपले भविष्य धोक्यात घालतोय, असे भूषण पवार यांनी सांगितले.

ठाणेकरांवर पाणीबिलाच्या थकबाकीचा डोंगर
स्टेशन परिसरात मीटर रिक्षा; शेअर थांबे हटणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here