हायलाइट्स:

  • कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तुरूंगाधिकाऱ्यांशी वाद
  • बडतर्फ महिला पोलीस कॉन्स्टेबलने गोळ्या घालण्याची दिली धमकी
  • जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : जिल्ह्यातील कळंबा कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तुरूंगाधिकाऱ्यांशी वाद घालत एका बडतर्फ महिला पोलीस कॉन्स्टेबलने गोळ्या घालण्याची धमकी दिली. याबाबत उज्वला झेंडे या वादग्रस्त महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात (महिला पोलीस अधिकारी) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही वर्षापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबार प्रकरणात उज्वला झेंडे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तिचा मुलगा सध्या एका प्रकरणात कळंबा कारागृहात आहे. त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर तेथे तुरूंगाधिकारी मीरा बाबर यांच्याशी तिने वाद झाला. माझ्यात अजूनही गोळ्या घालण्याची हिंमत आहे, असं म्हणत तिने बाबर यांना धमकी दिली. तेथून हटकल्यानंतर शिवीगाळही केली. यामुळे झेंडे हिच्यासह अन्य दोघांविरोधात बाबर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

भर बाजारात तरुणाच्या हत्येचा थरार; ७ जणांनी दगडाने ठेचून संपवलं!

उज्वला झेंडे आणि प्रेमाचा त्रिकोण

कोल्हापूर पोलीस दलात २० वर्षांपूर्वी प्रेमाचा त्रिकोण हे प्रकरण गाजलं होतं. यामध्ये उज्वला झेंडेवर एक पोलीस अधिकारी आणि आणखीन एक कर्मचारी प्रेम करत होता. या प्रकरणात उज्ज्वला झेंडे यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणी झेंडे यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांना पोलीस दलातून बडतर्फही करण्यात आले होते.

सध्या बडतर्फ महिला पोलीस झेंडे यांच्या मुलाला कळंबा कारागृहात एका गुन्ह्याखाली ठेवण्यात आलं आहे. कारागृहात तुरुंगाधिकारी मीरा बाबर यांनी त्याच्याकडे चौकशी करुन उज्ज्वला झेंडे यांच्याविषयी माहिती विचारली होती. बाबर यांनी चौकशीत कोणती माहिती विचारली, याचा निरोप झेंडे यांच्या मुलाने त्याला भेटायला गेलेल्या व्यक्तीकडून आई उज्ज्वला यांना दिला.

चालत्या बाइकवर कपलचा किसिंग स्टंट; औरंगाबादचा व्हिडिओ व्हायरल

मुलाचा निरोप कळताच उज्ज्वला झेंडे आणि बंगे नावाची एक व्यक्ती कळंबा कारागृहाच्या आवारात आली. कारागृहाच्या बाहेर गेटजवळ सर्वसामान्य लोकांना थांबण्यास मनाई असतानाही झेंडे आणि बंगे थांबले होते. त्यांना तुरुंगाच्या सुरक्षारक्षकांनी आवाराच्या बाहेर जाण्यास सांगताच झेंडे यांनी आरडाओरड सुरू केला. त्यांनी तुरुंगाधिकारी बाबर यांना बाहेर बोलवा, असा तगादा लावला. अखेर तुरुंग अधिकारी बाबर तुरुंगातून बाहेर आल्यावर झेंडेने त्यांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली.

दरम्यान, तुरुंगाधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल उज्ज्वला झेंडे व बंगे या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुजारी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here