मुंबई: करोना व्हायरसविरुद्ध लढ्यात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मोठी रक्कम दिली आहे. करोनामुळे देशात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू पुढे येत आहेत.

वाचा-
सचिन तेंडुलकरने करोनाविरुद्धच्या लढ्यात ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदत निधीला आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा ठरवले आहे. हा निधी करोना व्हायरसविरुद्ध लढ्यात वापरला जाणार आहे. करोना विरुद्धच्या लढ्यात सचिनला राज्य आणि केंद्र दोघांना मदत करायची होती म्हणून त्याने असा निर्णय घेतला.

वाचा-
सामाजिक कार्य आणि मदत निधीच सचिनचा नेहमी पुढाकार असतो. पण दरवेळी सचिन त्याबद्दलचा तपशील नेहमीच जाहीर करत नाही. सचिनच्या आधी भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही. सिंधूने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. इरफान आणि युसूफ पठाण यांनी ४ हजार मास्क दिले होते. तर धोनीने पुण्याच्या एका संस्थेला एक लाख रुपयांची मदत केली होती.

वाचा-
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया, धावपटू हिमा दास यांनी देखील अशाच प्रकारची मदत जाहीर केली आहे.

वाचा-

धोनीने पुण्यातील १०० कुटुंबीयांच्या अन्न-धान्याची घेतली जबाबदारी!
पुण्यात ज्यांचा रोजगार गेला आहे त्यांच्यासाठी धोनीने एका संस्थेला १ लाख रुपयांची मदत केली आहे. अनेक खेळाडू करोना संदर्भात राज्य सरकारांना मदतीचा हात पुढे करत आहेत. पण धोनीने थेट पुण्यातील एका संस्थेला मदत केली आहे. ही संस्था रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी काम करते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here