मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवले. जागतिक बाजाराशी संलग्न असून देखील सलग ६२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. तूर्त भारतीयांना महाग इंधन खरेदी करावं लागत आहे.

मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे.

मुंबईत आज एक लीटर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या भावात तेजी दिसून आली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव १.२ डॉलरने वाढला आणि तो ७८.९८ डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव ८७ सेंट्सने वाढून ७६.०८ डॉलर प्रती बॅरल झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here