औरंगाबाद : गरिबांची कार म्हणजेच दुचाकी. मात्र, याच दुचाकीवर चोरट्यांची नजर असून गेल्या अकरा महिन्यात औरंगाबादमध्ये तब्बल ८४० मोटारसायकल चोरीला गेल्याची पोलिसात नोंद आहे. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली असून, २०२१ मध्ये मोटारसायकल चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले आहे.

सर्वसामान्य लोकांसाठी दुचाकी त्यांचा आयुष्याचा आता एक भाग बनला आहे. कारण यामुळे अनेकांचे पोट भरते. तर अनेक जण वर्षोनुवर्षे गाडीचे हप्ते भरून एक दुचाकी घेण्याच आपलं स्वप्न पूर्ण करतात. पण गोरगरिबांच्या याच स्वप्नावर आता चोरांचा डोळा आहे. औरंगाबाद शहर हद्दीत १ जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर अखेरीस ८४० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या दुचाकीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अल्प असून, फक्त २५६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

एसटी संप मिटला का? लांब पल्याच्या बसेस धावल्या; महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ
चोरीचे प्रमाण वाढले…

औरंगाबाद शहरात गेल्यावर्षी म्हणजेच २०२० मध्ये ५४८ दुचाकी चोरीला गेल्या होत्या तर, २०२१ मध्ये ८४० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. जबर चोरीची संख्या २०२० ला ९८ तर २०२१ ला ११० झाली आहे. मंगळसूत्र चोरी २०२० ला २१ तर २०२१ ला ३८ झाली आहे. मोबाईल चोरी ८२ वरून ८५ वर गेले आहेत. त्यामुळे शहारत सर्वच चोऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचं पाहायला मिळत आहे.

धावत्या ट्रेनमध्ये हात धुताना महिला चिमुकल्यासोबत पडली खाली, पती पाहण्यासाठी गेला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here