हायलाइट्स:

  • तालिबान्यांनी पुतळ्यांचे मुंडके छाटले
  • बघ्यांकडून ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

काबूल, अफगाणिस्तान :

अफगाणिस्तानात सत्ता बळकावल्यानंतर तालिबानी राजवटीकडून दररोज नवनवीन जाचक कायदे लागू केले जात आहेत. आता, तालिबाननं दुकानांत लावण्यात आलेले मॉडल्सचे पुतळे ‘गैर इस्लामिक‘ असल्याचा निर्वाळा दिलाय. इतकंच नाही तर हे पुतळे म्हणजे ‘इस्लाम प्रति अपमानजनक’ असल्याचं सांगत तालिबान्यांनी या पुतळ्यांचे मुंडकेच छाटलेत.

पुतळ्याचे मुंडके छाटताना काढण्यात आलेले व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत. या व्हिडिओत काही अज्ञात लोक पुतळ्यांची नासधूस करताना दिसत आहेत. जवळपास १०-१२ पुतळ्यांचे मुंडके जमिनीवर पडल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यांच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत जे ‘अल्लाह हु अकबर‘च्या घोषणा देत आहेत. अर्थात तालिबान्यांच्या या कृत्यामुळे जनतेत जरब, दहशत बसलीय, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हेरात प्रांतातील दुकानांमध्ये पुतळ्यांचे मुंडके छाटण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. तालिबानं या पुतळ्यांना ‘मूर्ती’ म्हटलंय, या मूर्ती गैर-इस्लामिक असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. इस्लामची व्याख्या अतिशय कठोर करून तालिबानकडून मनमानी पद्धतीनं पुतळ्यांचे मुंडके छाटण्यासारखे विचित्र आदेश जारी केले जात आहेत.

US Russia: रशियानं हल्ला केला तर ‘निर्णायक’ कारवाई; बायडन यांच्याकडून युक्रेनला मदतीचं आश्वासन
Reham Khan: पंतप्रधान इम्रान खान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांच्यावर जीवघेणा हल्ला
दुकानदारांचे प्रश्न आणि ‘तालिबानी’ उत्तरं

यापूर्वी तालिबानने दुकानांमधून पुतळे काढून टाकण्याचे आदेश जारी केले होते. मात्र, आपला व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त करत काही दुकानदारांनी यास नकार दिला होता. दुकानदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर तालिबान मंत्रालयाचे प्रमुख शेख अजीज-उल-रहमान यांनी युक्ती शोधून काढली. त्यांनी ‘केवळ पुतळ्यांचा शिरच्छेद‘ करण्याचे आदेशदिले. मात्र, पुतळ्यांची मुंडकी छाटल्यानंतरही आपल्या व्यवसायाला जे नुकसान व्हायचंय ते होणार असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.

तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार?

उल्लेखनीय म्हणजे, तालिबाननं सत्ता आपल्या हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानवर आर्थिक संकटही ओढावलंय. अफगाणिस्तानातील अर्थव्यवस्था जवळपास उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली तर हेच नियम आणखीन कठोर केले जातील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

‘करोना’मुळे कोमात पोहचलेल्या महिलेला ‘व्हायग्रा’मुळे मिळालं नवं जीवन
Corona Vaccination: करोना लसीच्या तिसऱ्या डोसमुळे ८८ टक्के संरक्षण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here