हायलाइट्स:

  • मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांमध्ये होतेय वाढ
  • मुंबई लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबत महत्वाची माहिती
  • मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिली माहिती
  • गरज भासली तर राज्य सरकार याबाबत निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई: मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात करोना (कोरोना) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन (Lockdown in मुंबई) लागण्याचे संकेत विविध स्तरांवरून दिले जात असताना, मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ही शक्यता आता दूर झाली आहे. मुंबई उपनगरीय लोकल प्रवासावर कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रस्ताव अद्याप तरी नाही, असे मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेय. त्यामुळे मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला तूर्तास तरी मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात कैक पटीने मुंबईत करोनाचे रुग्ण वाढले आहेत. सध्याची परिस्थिती बघता मुंबईसह राज्यात करोनाची तिसरी लाट धडकल्याचे चित्र आहे. त्यात ओमिक्रॉन (Omicron) चे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अशात आता राज्यात लॉकडाउन लागण्याचे संकेत विविध स्तरांतून मिळत आहेत. त्याचवेळी मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ असलेल्या मुंबई उपनगरीय लोकल प्रवासावर निर्बंध आणले जातील का, अशी चर्चा होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. अद्याप निर्बंध लागू करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Corona in Mumbai: लंडनमध्ये निगेटिव्ह, मुंबईत उतरताच करोना पॉझिटिव्ह
मुंबई पुन्हा एकदा करोनाचा हॉटस्पॉट, लॉकडाऊन नेमका कधी लागणार, पालिका आयुक्त म्हणाले…

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, शहरामध्ये कोविड १९ रुग्णांची संख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट दिवसागणिक वाढत असले तरी, मुंबई महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. महापालिका प्रशासन कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की मुंबई उपनगरीय लोकल प्रवासावर निर्बंध लादण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही.

तशी गरज भासली तर, महाराष्ट्र सरकार त्याबाबत कोविड १९ टास्क फोर्सशी सल्लामसलत करून निर्णय घेईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला ९० टक्के करोना रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. केवळ चार ते पाच टक्के रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तसेच गंभीर रुग्णांची संख्या अगदी नगण्य आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत जवळपास ३० हजार ५०० खाटांपैकी साडेतीन हजार खाटांवरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच पुरेसा ऑक्सिजन पुरवठा, औषधे, व्हेंटिलेटर्स, आयसीयू सुविधा आणि रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Corona Vaccination: करोना लसीच्या तिसऱ्या डोसमुळे ८८ टक्के संरक्षण

मुंबईत सोमवारी आठ हजारांहून अधिक करोना रुग्ण

मुंबईत सोमवारी करोनाचे ८, ०८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १८ एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदाच शहरात दिवसभरात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. मागील एका आठवड्यात जवळपास दहा पटीने नवीन रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here