State Government Ministers Lie Babanrao Lonikar Alleges | ‘राज्य सरकारमधील मंत्री धादांत खोटे बोलतात’, बबनराव लोणीकरांचा गंभीर आरोप | Maharashtra Times
जालना : करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा समर्थपणे सामना करण्यासाठी, आरोग्य सुविधा वाढवली म्हणणारे मंत्री खोटारडे असल्याचा घणाघात परतूरचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सरकारवर केला आहे. राज्य सरकारमधील मंत्री खोटारडेपणा करत असून आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या लाटेचा सामना करण्यासाठी आजही ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयात कुठलीच व्यवस्था नसल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. (राज्य सरकार मंत्री खोटे बोलतात बबनराव लोणीकर यांचा आरोप)
मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊन या लाटेचा सामना करण्यासाठी व्यवस्था सज्ज असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे धादांत खोटे असून आजच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे येथे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन आद्यपही उपलब्ध नाही असं आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. एसटी संप मिटला का? लांब पल्याच्या बसेस धावल्या; महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ आरोग्य मंत्री म्हणतात त्याप्रमाणे करोनाची तिसरी लाट आल्यास, आहे त्या परिस्थितीत या लाटेला थांबवणे अशक्य असून आजही ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा रामभरोसे असल्याची टीका आमदार लोणीकर यांनी केली आहे. आपण ग्रामीण भागात असलेल्या अपुऱ्या आरोग्य सुविधा संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य सुविधा संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करून गंभीरतेने सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले होते. परंतु उच्च न्यायालयाने ताशेरे ओढूनही राज्यातील सरकार ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासा बाबत गंभीर नसल्याचा घणाघात आमदार लोणीकर यांनी केला आहे.
धावत्या ट्रेनमध्ये हात धुताना महिला चिमुकल्यासोबत पडली खाली, पती पाहण्यासाठी गेला अन्… संभाव्य लाटेचा धोका ओळखून आतातरी सरकारमधील मंत्र्यांनी खोटे बोलण्यापेक्षा वेळीच सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा येणाऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा विनाकारण अनेक नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागेल. (State government ministers lie Babanrao Lonikar alleges)