हायलाइट्स:

  • एसटी कामगारांचा संप सुरू असतानाच दापोलीत धक्कादायक प्रकार
  • दापोलीतील पालगड येथे एसटी बसवर फेकला दगड
  • एसटी बसची काच फुटली, चालक जखमी
  • दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोली: रत्नागिरी (रत्नागिरी) जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पालगड येथे एसटी बसवर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात एसटीचे नुकसान झाले आहे. तर चालकही जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात दापोली (दापोली) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात काही ठिकाणी एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. अद्याप काही ठिकाणी एसटी बसच्या फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. तर काही आगारांतून बस सोडण्यात येत आहेत. एसटी बसफेऱ्या काही प्रमाणात सुरू असल्या तरी, बसवर दगडफेकीचे प्रकार घडू लागल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पालगड येथे एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. मंडणगड येथून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. यात बसचालक जखमी झाला तर, एसटी बसचेही नुकसान झाले आहे. रविवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

‘मी निवडणुकीचा पूर्णवेळ प्रचार केला असता तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल वेगळा लागला असता’
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, पुलाचा कठडा तोडून ट्रक हवेत लोंबकळला

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक अनंत दयाळकर (वय ५०) हे दापोली आगारातून एसटी बस घेऊन रविवारी २ जानेवारी रोजी मंडणगडवरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास ते पालगड येथे दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने दगड फेकल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

दापोली, मंडणगड नगरपंचायतींच्या चार जागांसाठी निवडणूक, शिवसेनेच्या बंडखोरांनी भरले उमेदवारी अर्ज
आजारपणात पती गमावला, पुरानंतर कुटुंबासाठी सुरू आहे ‘तिची’ एकाकी झुंज

पालगड परिसरात असलेल्या जोशी बंगल्याच्या पुढे अनोळखी व्यक्तीने धावत्या बसवर दगड भिरकावला. हा दगड बसच्या समोरील काचेवर लागल्याने काच फुटली. त्यानंतर दगड थेट चालक अनंत दयाळकर यांच्या उजव्या पायालाही लागला. यात ते जखमी झाले आहेत. या घटनेत एसटीचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मिलिंद चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here