हायलाइट्स:
- मुंबईत झपाट्याने वाढतेय करोना रुग्णसंख्या
- मुंबई महापौर किशोर पेडणेकर यांनी दिला इशारा
- दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांपल्याड गेल्यास लॉकडाउन लागू करणार -पेडणेकर
दैनंदिन रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा पार केला तर, आम्ही मुंबईत लॉकडाऊन लागू करू, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर (किशोरी पेडणेकर) यांनी दिला. दरम्यान, मुंबईत सोमवारी एकाच दिवसात ८०८२ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. १८ एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने दिवसाला रुग्णांची नोंद झाली आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने निर्बंध कठोर करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाने कालच पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.
दरम्यान, मुंबईत सोमवारी ८ हजार ८२ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या बरोबरच एकूण ६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ५१ हजार ३५८ इतकी झाली आहे. तसेच, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर गेला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या २९ हजार ८२९ इतकी आहे. तसेच मुंबई शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर १३८ दिवसांवर पोहचला आहे. मुबंईत आताच्या घडीला ३७ हजार २७४ सक्रीय रुग्ण आहेत.
तत्पूर्वी, मुंबई उपनगरीय लोकल प्रवासासंदर्भात महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महत्वाची माहिती दिली आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाउन लागू करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध लादण्यात येतील अशी चर्चा होती. पण महापालिका अधिकाऱ्याने ही शक्यता फेटाळून लावली. सध्या तरी लोकल प्रवासासंदर्भात कोणतेही निर्बंध लादण्यासंबंधी प्रस्ताव नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.