‘सुवर तो झुंड में आते है, शेर तो अकेला आता है, माईंड इट’ अशा मथळ्याचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. यावर आता शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरीत राणे समर्थकांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी राणे समर्थकांनी सोशल मीडियावर एक कार्टून व्हायरल केले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी नारायण राणे यांनी पकडलेली दिसत आहे. विशेष म्हणजे हा वाघ मांजरीसारखा दिसत आहे. या माध्यमातून राणे समर्थकांनी एकप्रकारे शिवसेनेची खिल्ली उडविली होती. तत्पूर्वी मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारी नितेश राणे यांची खिल्ली लावणारे बॅनर्स लावण्यात आले होते. ‘हरवला आहे’ अशा मथळ्याखालील या बॅनरमध्ये नाव नितेश नारायण राणे, उंची दीडफुट, रंग गोरा, वर्णन डोळे नेपाळ्यासारखे, डोक्याने मंद असा मजकूर लिहण्यात आला होता. पोलिसांनी हे बॅनर्स तातडीने उतरवले होते.
नितेश राणेंना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण
संतोष परब हल्लाप्रकरणामुळे गोत्यात आलेले भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल.
यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अटकेच्या भीतीने नितेश राणे तब्बल आठवडाभरापासून अज्ञातवासात आहेत. मात्र, आता अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्याने ते अज्ञातवासातून बाहेर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाने याप्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याला मंजूरी देणे, हादेखील नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आता नितेश राणे आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तिवाद होणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: रत्नागिरी महाराष्ट्रात बॅनर लावून नारायण राणे समर्थकांची शिवसेनेची छेड
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times