नवी दिल्ली: देशावर जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा भारतीय लष्कराने पुढे येत प्रभावी भूमिका अदा केली आहे. लष्कराच्या परंपरेनुसार आताही देशावर करोनासारख्या जागतिक साथीच्या आजाराचे संकट आले असताना, पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सुरू करत करोनाविरुद्ध युद्ध छेडले आहे.

पराक्रम अभियानाप्रमाणेत तयार आहे लष्कर
सर्व लष्करी अधिकारी आणि जवानांच्या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली असून अशाच प्रकारे सन २००१ मध्ये पराक्रम अभियानाच्या वेळी ८ ते १० महिन्यांच्या कालावधीत कुणालाही सुट्टी देण्यात आलेली नव्हती, अशी माहिती भारताचे मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. पराक्रम अभियानावेळी देखील आम्हाला विजय मिळाला होता. आता नमस्ते अभियानदेखील यशस्वी होणार असा ठाम विश्वासही लष्करप्रमुखांनी व्यक्त केला.

भारतीय लष्कराची संस्थात्मक रचना आणि प्रशिक्षणाच्या बळावर अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करणे शक्य होते, असेही नरवणे म्हणाले. कोविड-१९ शी लढताना आम्ही याच क्षमतांचा वापर करू असे ते म्हणाले.

करोना विषाणूशी सुरू झालेल्या लढाईत सरकार आणि सामान्य प्रशानाला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे असेही लष्करप्रमुख म्हणाले. एक लष्करप्रमुख या नात्याने सैन्यदलाला फीट ठेवणे माझी जबाबदारी आहे. देशाच्या रक्षणासाठी आम्हाला स्वत:ला सुरक्षित आणि फीट राखणे अत्यंत महत्वाचे आहे. हेच लक्षात घेत आम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये एका आठवड्यात २-३ अॅडव्हाझरी जारी केली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

करोनाविरुद्ध ‘नमस्ते अभियान’

मागील सर्व अभियानांमध्ये लष्कराला यश मिळाले होते आणि आता या नमस्ते अभियानामध्येही आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असे नरवणे म्हणाले. लष्कराने देशभरात ८ क्वारंटाइन सेंटर्स उभारले आहेत. तसेच लष्कराने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. यासाठी लष्कराने सदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कंमांड, नॉर्दन कमांड, साऊथ वेस्टर्न कमांड आणि दिल्ली मुख्यालयात करोना हेल्पलाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. या सेंटर्सच्या माध्यमातून करोनाची लागण झालेल्या नागरिकांना मदत पुरवली जाणार आहे. या बरोबरच, या संकटाचा सामना कसा करावा, याची माहितीही सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here