शिवशाहीचे सरकार असताना बीडीडी चाळीतील पुनर्विकासात ३०० चा कार्पेट एरिया मिळत होता. फडणवीस सरकारच्या काळात तो ५०० चौरस फूट करण्यात आला. या कामाला आव्हाड साहेबांनी गती दिली.

नायगावमधील बीडीडी चाळीतील दोन जुन्या इमारती राज्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पाडण्यात आल्या.
हायलाइट्स:
- नायगावमधील बीडीडी चाळीतील दोन जुन्या इमारती राज्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पाडण्यात आल्या
- यावेळी रंगलेल्या मानापमान नाट्याची आणि मनधरणीच्या प्रसंगाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे
याठिकाणी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना कालिदास कोळंबकर यांनी म्हटले की, शिवशाहीचे सरकार असताना बीडीडी चाळीतील पुनर्विकासात ३०० चा कार्पेट एरिया मिळत होता. फडणवीस सरकारच्या काळात तो ५०० चौरस फूट करण्यात आला. या कामाला आव्हाड साहेबांनी गती दिली. ते प्रत्येक अडचणीला धावून येतात. फक्त या विभागाचा स्थानिक आमदार म्हणून मला कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला पाहिजे होते, असे कोळंबकर यांनी म्हटले. यावर बाजूलाच उभ्या असणाऱ्या आव्हाड यांनी सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी… आता अजून काय पाहिजे?, असे म्हणत कोळंबकर यांची जाहीर माफी मागतली. कालिदास कोळंबकर हे माझे जवळचे मित्र आहेत. ते कायम माझ्यासोबत असतात. म्हाडाकडून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते वेळेत येऊ शकले नाहीत. यासाठी मी त्यांची क्षमा मागितली आहे. आता मित्र या नात्याने ते मला माफही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले.
ओबीसींवर माझा फार विश्वास नाही । जितेंद्र आव्हाड
‘शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घ्यावा’
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आंदोलनात ओबीसीच्या सहभागावरुन एक विधान केलं होतंय या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपनंही हा मुद्दा उचलून धरत आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसीनबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील का, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ओबीसी समाजाची माफी मागावी,’ अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून